जळगाव, दि. 29
- दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही
दिन सोमवार, दिनांक 3 सप्टेंबर, 2018 रोजी
दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी
कार्यालय आवारातील नियोजन भवनात आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी किशोर
राजे निंबाळकर यांनी दिली आहे.
जनतेची गाऱ्हाणी व तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर दर
महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सोमवार, दिनांक 3 सप्टेंबर, 2018 रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनी नागरिकांनी आपल्या तक्रारी
लेखी स्वरुपात आणाव्यात, असे आवाहन
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
०००
No comments:
Post a Comment