जळगाव, दि.30- राज्याचे सामाजिक न्याय
आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ
राज्यमंत्री ना. दिलीप कांबळे हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा
दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
रविवार
दि. 2 सप्टेंबर, 2018 रोजी रात्री 12 वा 20
मि.नी बडनेरा रेल्वेस्टेशन येथून सेवाग्राम एक्सप्रेसने रेल्वेने जळगावकडे प्रयाण.
पहाटे 4 वा. 15 मि.नी. जळगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन व शासकीय वाहनाने अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. पहाटे 4 वा 30 मि.नी. अजिंठा शासकीय
विश्रामगृह जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9 वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव
येथून मुक्ताईनगरकडे प्रयाण. सकाळी 10 वा 45 मि.नी मुक्ताईनगर येथे आगमन. सकाळी 11
वा अल्पसंख्यांकांसाठी पहिल्या शासकीय तंत्रनिकेतन इमरतीचे भूमीपूजन, (स्थळ :-
मुक्ताईनगर जि. जळगाव) दुपारी 2 वा. 30
मि.नी. मुक्ताईनगर येथून शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 4 वा. अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन. दुपारी 4 वा. 10 मि.नी जळगाव महानगरपालिकेला देण्यात आलेल्या
विशेष घटक योजना दलित वस्ती विकास निधीच्या माध्यमातुन गेल्या 8 वर्षात झालेल्या
खर्चाचा आढावा बैठक. (स्थळ :- अजिठा शासकीय विश्रामगृह. जळगाव) सायं 5 वा. सामाजिक न्याय विभागाची जिल्हास्तरीय
आढावा बैठक ( स्थळ – अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव) सायं 5 वा. 30 मि.नी जळगाव जिल्हयातील मदत व
पुनवर्सन विभागाच्या कामाचा आढावा बैठक.
(स्थळ :- अजिठा शासकीय विश्रामगृह. जळगाव) सायं 6 वा. अजिंठा शासकीय
विश्रामगृह, जळगाव येथुन शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment