जळगाव, दि. 3 - जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक /
माजी सैनिक विधवा यांना सुचित करण्यात येते की, त्यांच्या पाल्यांनी केंद्र सरकार
(केंद्रिय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली) यांचेमार्फत सन 2017-18 या शैक्षणिक
वर्षामध्ये 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविलेले विद्यार्थी पात्र आहे. याबाबतची
सर्व माहिती www.ksb.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
दिलेल्या वेबसाईवर जाऊन
ऑनलाइन अर्ज भरुन त्याची प्रत व संलग्न कागदपत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,
जळगाव येथे 15 नोव्हेंबर, 2018 पुर्वी स्वत: आणून पडताळणी करुन घ्यावेत. विहित
नमुन्यातील सुधारित अर्ज व माहितीपत्रक मिळणेकरिता किंवा जुनी शिष्यवृत्ती
नूतनीकरण (Renewal ) करणेकरिता केंद्रिय
सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्या www.ksb.gov.in (Renewal of PMSS ) या
वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिक / माजी सैनिक विधवा यांच्या
पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००
No comments:
Post a Comment