जळगाव, दि.१३ - राज्याचे कृषी व
फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत हे मंगळवार
व बुधवार दि. १४ व १५ ऑगस्ट, २०१८ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे-
मंगळवार,
दि. १४ ऑगस्ट, २०१८ रोजी दुपारी २ वा. ३० मि. नी शासकीय निवासस्थान क-६ येथून
शासकीय मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण. दुपारी ३ वा.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२१३९ सेवाग्राम एक्सप्रेसने जळगावकडे
प्रयाण. रात्री ९ वा. ५० मि. नी. जळगाव येथे आगमन व अजिंठा शासकीय विश्रामगृह,
जळगावकडे प्रयाण. रात्री १० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व
मुक्काम.
बुधवार,
दि. १५ ऑगस्ट, २०१८ रोजी सकाळी ८ वा. ५०
मि. नी अजिंठा शासकीय विश्रामगृह येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी,
कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी ९ वा. ०५ मि. ते १० वा १५ मि. नी. स्वातंत्र्य दिनाचा ७१ वा वर्धापन दिनाच्या
ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रम. स्थळ:- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव संदर्भ-मा.
जिल्हाधिकारी, जळगाव. सकाळी १० वा ३० मि. नी. कार्यक्रमस्थळ येथून जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी १०.४५ वाजता बोंडअळी प्रचार व प्रसार
वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्याचा शुभारंभ. स्थळ - जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
कार्यालय, जळगाव. सकाळी ११.०० वाजता कार्यक्रमस्थळ येथून श्री. प्रमोद नेवे यांच्या
निवासस्थानाकडे प्रयाण. सकाळी ११.१० वा. प्रमोद नेवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा
भेट. सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून शासकीय मोटारीने
बोंडअळीग्रस्त शेतक-यांच्या शेताकडे प्रयाण. सकाळी ११.४५ ते १.०० वाजेपर्यंत कापूस
शेताची पाहणी व शेतकऱ्यांसमवेत शेतावर चर्चा. स्थळ- ढोरमाळ, ता. मुक्ताईनगर.
दुपारी १.०० वाजता बुलडाणाकडे प्रयाण.
000
No comments:
Post a Comment