जळगाव, दिनांक 24 - खतांवरील अनुदान हे फक्त शेतक-यांसाठी आहे. या अनुदानाच्या किंवा अनुदानित खतांचा गैरवापर होऊ नये व शेतक-यांना वेळेवर खतांचा पुरवठा व्हावा यासाठी केंद्र शासनाने थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु केलेली आहे.
राज्यातील सर्व जिल्हयांत 1 जानेवारी, 2017 पासून थेट लाभ हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली आहे. खते खरेदीस जातांना शेतक-याने स्वत:चे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक बरोबर घेऊन जाणे. आधार क्रमांक पॉस मशिनमध्ये नोंदवुन बोटाचा ठसा पॉस मशिनला दिल्यानंतर शेतक-यांची ओळख पटते. त्यानंतर आवश्यक खतांचा तपशिल पॉस मशिन मध्ये नोंदविल्यानंतर बील तयार होते त्या बीलाप्रमाणे रक्कम देऊन खते घ्यावीत.
यासाठी प्रत्येक विक्रत्यांकडे पॉस मशिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अनुदानित खते खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले असून खते फक्त पॉस मशिन मार्फतच विक्री करण्यात येत आहेत. ऐन हंगामात एकाचवेळी शेतक-यांची गर्दी होते. अशा वेळी शेतक-यांनी संयम ठेऊन खते खरेदी करावीत शक्य झाल्यास हंगामपूर्व खते खरेदी करावीत.
पॉस मशिनमधील साठा व विक्रेत्यांकडील प्रत्यक्ष साठा यांची तपासणी खात्याच्या अधिका-यांमार्फत वारंवार करण्यात येणार आहे. शेतक-यांनी फक्त स्वत:ला आवश्यक असलेली खते खरेदी करावीत. इतर शेतक-यांची खते स्वत:चे नावे खरेदी करुन नयेत. खते खरेदी करण्याबाबत काही अडचणी आल्यास कृषि अधिकारी पंचायत समिती / तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक 18002554000 वर सपंर्क साधावा. असे कृषि आयुक्त, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
0 0 0

No comments:
Post a Comment