Thursday, 30 August 2018

इंडिया पोस्ट पेमेंटस बॅकेच्या जळगाव शाखेचा 1 सप्टेंबरला उदघाटन सोहळा


            जळगाव, दि.30- इंडिया पोस्ट पेमेंटस बँक (IPPB) जळगाव शाखेचे उदघाटन दिनांक 1 सप्टेंबर  2018 रोजी दुपारी 2 वा 30 वाजेपासून खासदार श्री. ए.टी.नाना पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. या प्रसंगी मा. आमदार श्री. सुरेश भोळे व श्री. चंदुलाल पटेल यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याच प्रमाणे सदरील पेमेंटस बॅकेच्या एम.जे कॉलेज पोस्ट ऑफिस access point  चे उध्दाटन मा. महापौर श्री. गणेश सोनवणे यांच्य हस्ते त्याचवेळी होणार आहे.
             याप्रसंगी राष्ट्रीय स्तरावर सदरील बॅकेचे उध्दघाटन मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्याचे थेट प्रक्षेपन कार्यक्रमस्थळी दाखविण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बँक हा डाक विभागाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून या व्दारे बॅकिंग सेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवण्याचा विभागाचा मानस आहे. सदरील बँक पूर्णत: पेपरलेस असून डीजिटल असणार आहे. अकौंट उघडण्यासाठी फक्त आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे.
            सद्दस्थितीत जळगाव जिल्हयात 5 ठिकाणी या बॅकेची सेवा मिळणार असून टप्प्याटप्याने सर्व कार्यालये या सेवेशी जोडली जाणार आहेत.असे अधीक्षक डाकघर जळगाव डाक विभाग जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
                                                                                ०००

No comments:

Post a Comment