Friday, 3 August 2018

विशेष गौरव पुरस्कारसाठी अर्ज करण्याचे आवाहन


        जळगाव, दि. 3 - विविध क्षेत्रात अति उत्कृष्ट कार्य करणा-या माजी सैनिक/पत्नी/पाल्य यांनी शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षासाठी देश व राज्याची प्रतिष्ठा वाढवतील, अशा स्वरुपाचे लक्षणीय काम केलेले असेल त्यांना एकरकमी 10 हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी 25 हजार रुपयांचा विशेष गौरव पुरस्कार तसेच इयत्ता 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षेत 90% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या पाल्यांना एअर मार्शल व्ही.ए.पाटकर विशेष गौरव पुरस्कार सैनिक कल्याण विभाग, पुणे यांचे मार्फत दिला जातो.
            पात्र माजी सैनिक/पत्नी/पाल्य/ यांनी या संधीचा लाभ घ्यावा. दिनांक 10 सप्टेंबर, 2018 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव यांचेकडे अर्ज सादर करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.                           
०००

No comments:

Post a Comment