जळगाव, दि. 21 - चौथी राष्ट्रीय हातमाग विणकर जनगणना 2017,
संपूर्ण भारत देशात आयोजित करण्यात आलेली आहे. सदर गणनेचे काम महाराष्ट्र
राज्यामध्ये अंतिम टप्प्यात असून सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर/मजूर यांना
जाहीर आवाहन करण्यात येते आहे.
या
जनगणनेत ज्या विणकरांचा समावेश झालेला नसेल त्यांनी खालील दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन
नोंदणी करावी किंवा आपल्या नजीकच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय/
प्रादेशिक उपसंचालक, (वस्त्रोद्योग) यांचे कार्यालयाशी दि. 30 ऑगस्ट 2018 पूर्वी
संपर्क साधावा. असे प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
संपर्क साधण्याचा पत्ता -
प्रादेशिक उपसंचालक, वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज
बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, दुरध्वनी क्र-022/25405363,
०००
No comments:
Post a Comment