Monday, 20 August 2018

टपाल विभागाची ‘दीनदयाल स्पर्श’ योजना अंतर्गत नवीन शिष्यवृत्ती योजना


           जळगाव, दि. 20 – भारतीय डाक विभागाने दीनदयान स्पर्श योजनेंतर्गत  नवीन  शिष्यवृत्ती योजना आयोजित केली आहे. या शिष्यवृत्ती ही एक वर्षापर्यंत वैध राहील. या शिष्यवृत्ती अंतर्गत रुपये 500 प्रती महिना या प्रमाणे वार्षिक रुपये 6 हजार शिष्यवृत्ती मिळेल. या शिष्यवृत्तीला इयत्ता 6 ते 9 वी पर्यंतचे फिलाटेली या विषयांचा छंद असलेले विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतात. तसेच स्पर्धक हा मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असावा, त्या शाळेत फिलाटेली क्लब असावा, व स्पर्धक त्याचा सदस्य असावा, सदर शाळेत फिलाटेली क्लब उपलब्ध नसल्यास स्पर्धकाचे स्वत:चे फिलाटेली  (डिपॉझीट) खाते असावे, सदर फिलाटेली खाते जवळच्या पोस्टात उघडता येईल. स्पर्धकास शालेय परीक्षेत किमान 60 टक्के गुण असावेत. एस.सी/ एस टी च्या स्पर्धकांना 5 टक्के शिथिल केलेले आहे. निवड पद्धत दोन स्तरांतून करण्यात येईल स्तर-1 फिलाटेली  प्रश्नमंजुषा स्तर- 2 फिलाटेली  प्रश्नमंजुषा  मधून निवड झालेल्या स्पर्धकांना फिलाटेली  प्रोजेक्ट सादर करावा लागेल. फिलाटेली प्रश्नमंजुषेसाठी फॉर्म देण्याची अंतिम तारीख 24 ऑगस्ट 2018 आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी जळगाव मुख्य डाक घर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिस ला संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर जळगाव श्री रा. भि. रनाळकर  यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:

Post a Comment