Friday, 24 August 2018

परिवहन वाहनांच्या भार क्षमतेत वाढ करणेबाबत आवाहन

     जळगाव, दि. २४ - केंद्र शासनाच्या ६ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या अधिसूचनेव्दारे परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राष्ट्र, मुंबई यांचे आदेशानुसार परिवहन वाहनांच्या (मोटार कॅब वगळून ) कमाल सुरक्षित अक्ष वाहन (Maximum safe axle weight) मध्ये परिवहन वाहने यांच्या सध्याच्या एकूण भार वाहन क्षमता (GVW) १६२०० पासून पुढील परिवहन वाहनांचे सुधारणा करण्यात आली आहे.
     वाढीव  GVW करीता मोटार वाहन कराचा फरक (एक रकमी कर लागू असल्यास त्यासह) कराचा फरक ही अधिसूचना अंमलात आल्याचा दिनांकापासून म्हणजेच दि. ६ ऑगस्ट २०१८ पासून व्याजासहीत भरावयाचा आहे. 
     जिल्ह्यातील सर्व संबधित मोटार वाहनधारकांना कळविण्यात येते की, त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव कार्यालयात साध्या कागदावर अर्ज करुन अर्जासोबत मूळ नोंदणी पुस्तक व परवाना सादर करुन विहित शुल्कासह सुधारित GVW (भार क्षमता) ची नोंद करुन कराची फरकाची रक्कम भरण्यात यावी. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा. असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी कळविले आहे.
                                                                       000

No comments:

Post a Comment