Tuesday, 14 August 2018

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते संपन्न जळगाव येथे






            जळगाव दि. 15 - भारतीय स्वातंत्र्याच्या 71 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते करण्यात आले.
            यावेळी आमदार चंदूलाल पटेल, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त्‍ चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद भामरे, चिटणीस मंदार कुलकणी, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, यांचेसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, लोकप्रतिनिधी, विविध ‍विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, लहानमुले मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी जिल्हा पोलीस दलातील सहायक पोलीस उप निरिक्षक रविंद्र  बळीराम सपकाळे यांना पोलीस पदक जाहिर झाल्याबद्दल तसेच मागील वर्षी संगणीकरणाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा विज्ञान सुचना अधिकारी प्रमोद बोरोले, सहायक सुचना अधिकारी महेश पत्की यांचा ना. खोत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थितांना जागेवर जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस बॅन्ड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली.
            या कार्यक्रमापूर्वी भारतीय स्वातंत्र्याचा 71 वा वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी तंबाखू विरोधी शपथ घेतली.
000

No comments:

Post a Comment