जळगाव, दि. १३ - सर्वसामान्य नागरिकांना मोफत विधी सेवेबाबत
माहिती व्हावी, सर्वसामान्यांमध्ये मोफत विधी सेवेबाबत प्रचार व प्रसार होवून
त्याचा सर्वसामान्यांनी लाभ व्हावा. यासाठी
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांचेमार्फत कायदेविषयक माहिती असलेले
भित्तीपत्रक प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये लावण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
या भित्तीपत्रकाचे अनावरण जिल्हा
न्यायालयाचे आवरात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. ए. सानप यांचे हस्ते
करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे
मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲङ केतन
ढाके व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. के. एच. ठोंबरे हे उपस्थित होते.
भित्तीपत्रकाचे
वाचन ग्रामसभेत करणार
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे वाचन
ग्रामसभेचे दिवशी ग्रामसेवकांनी करावे. अशा सुचना सर्व ग्रामसेवकांना देण्यात
येतील. तसेच हे भित्तीपत्रक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लावले जाईल. असे जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिवेकर यांनी अनावरण प्रसंगी सांगितले.भित्तीपत्रक
तयार करण्यामागील भूमिका सचिव श्री के. एच. ठोंबरे यांनी विशद केली.
000
No comments:
Post a Comment