जळगाव, दि.
24- राजषी छात्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग, जळगाव यांचेतर्फे
जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अशासकीय अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित
कला वाणिज्य, विज्ञान, विधी व शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या प्राचार्य व शिष्यवृत्तीचे
काम करणारे लिपिक यांचेकरिता एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
अशी माहिती सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
धुळे
जिल्ह्याकरिता दि. 28 ऑगस्ट, 2018 रोजी दु. 12 वा विद्यावर्धिनी कला, वाणिज्य व विज्ञान
महाविद्यालय, धुळे येथे जळगाव जिल्ह्याकरीता दि. 29 ऑगस्ट, 2018 रोजी दु. 11 वा. मुळजी
जेठा महाविद्यालय, जळगाव येथे आणि नंदूरबार जिल्ह्याकरीता दि. 30 ऑगस्ट, 2018 रोजी
जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नंदुरबार येथे आयोजन
करण्यात आलेले आहे.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याचे
दृष्टीने विभागस्तरावर नोडल ऑफीसर म्हणून राम राठोड यांची नियुक्त करण्यात आलेली आहे.
तर जळगाव जिल्ह्यासाठी दिवाकर देशमुख, धुळे जिल्ह्यासाठी मोतीराम गावित व नंदुरबार
जिल्ह्यासाठी शांताराम शिर्के यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच तालुका स्तरावर
समन्वयकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या योजनेच्या पथदर्शी प्रकल्पांतर्गत मुळजी
जेठा महाविद्यालय, जळगाव तसेच जिजामाता शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
नंदुरबार या दोन महाविद्यालयांची निवड करण्यात आलेली आहे. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे
शिष्यवृत्ती अर्ज 27 ऑगस्ट, 2018 पासून ऑनलाईन पध्दतीने स्विकारले जाणार आहेत. यामध्ये
सर्व अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी
व शिक्षणाशास्त्र महाविद्यालयांचे प्राचार्य, लिपिक, विद्यार्थी यांनी पूर्ण सहभाग
नोंदवावा. असे आवाहन डॉ. केशव तुपे, विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, जळगाव विभाग, जळगाव
यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
000
No comments:
Post a Comment