जळगाव,
दि. 15 : ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील
सर्वसामान्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचून या योजनांचा त्यांना लाभ नागरीकांना
मिळण्यास मदत होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन,
पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत यांनी केले.
युनिसेफच्या
सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष
सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय,
जळगावच्यावतीने हाती घेतलेल्या ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ येथील
जिल्हा नियोजन सभागृहात ना. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते
बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, महापालिका आयुक्त्
चंद्रकांत डांगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा
पोलीस अधिक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस अधिक्षक मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष
गाडीलकर, उप वनसंरक्षक दिगंबर पगार, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवासी
उपजिल्हाधिकारी राहूल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद भामरे, चिटणीस मंदार कुलकणी, जिल्हा
पुरवठा अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह
वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना ना. खोत म्हणाले की, राज्य शासन नागरीकांसाठी अनेक लोकोपयोगी योजना
राबवित असते. या योजनांची माहिती नागरीकांना विविध माध्यमाद्वारे होत असते. परंतु
‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या माध्यमातून या योजनांची माहिती घरोघरी जाऊन दिली
जाणार असल्याने शासनाच्या योजनांची माहिती प्रभावीपणे नागरीकांपर्यत पोहोचण्यास
मदत होणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने हा अभिनव उपक्रम हाती घेतल्याचे
गौरोवोद्वगार त्यांनी याप्रंसगी काढले. त्याचबरोबर सामाजिक बांधीलकीच्या नात्याने
जास्तीत जास्त महाविद्यालयीन युवकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शासनाच्या योजना
नागरीकांपर्यंत पोहचविण्यास हातभार लावण्याचे आवाहनही ना. खोत यांनी केले.
यावेळी ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण ना.
खोत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा
माहिती अधिकारी विलास बोडके यांनी युवा माहिती दूत उपक्रमाची माहिती विशद केली.
याप्रसंगी उपस्थितांना युवा माहिती दूत उपक्रमाची चित्रफित दाखविण्यात आली. या
कार्यक्रमास विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विविध महाविद्यालयांचे
विद्यार्थी तसेच संस्थाचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment