Thursday, 5 April 2018

अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत 10 एप्रिलपर्यंत


            जळगाव, दि. 5 - अखिल भारतीय शिकाऊ उमेदवारी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 10 एप्रिल, 2018 पर्यंत आहे. अशी माहिती सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांनी दिली आहे.
             या परीक्षेस बसलेल्या सर्व संबंधित विद्यार्थ्यानी मुदतीत मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र व्दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव (बीटीआरआय, जळगाव) या कार्यालयातून गुणपत्रक (मार्कशीट) घेवून जावे. असे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार यांनी कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment