जळगाव, दि. 21 - सडक सुरक्षा- जीवन रक्षा हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यात येत्या २३ एप्रिलपासून ते ७ मे २०१८ पर्यंत रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानानिमित्त जिल्ह्यात रस्ते सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली आहे.
जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान 2018 चे उदघाटन सोमवार दि. 23 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता खासदार ए. टी. नाना पाटील यांच्या हस्ते परिवहन कार्यालय येथे होणार आहे. तसेच या अभियानानिमित्त शहरातील महत्वाच्या ठिकाणी रस्ता सुरक्षेसंदर्भात बॅनर्स, होर्डींग लावण्यात येणार आहेत. 24 एप्रिल रोजी एस.टी. महामंडळाचे वाहन चालकांसाठी सुरक्षित वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 25 एप्रिल रोजी रस्ता सुरक्षापर महत्वाच्या ठिकाणी चौक सभा व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती होण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. 26 एप्रिल रोजी रस्ता सुरक्षेवर मोटार सायकल स्वार यांची हेल्मेट रॅली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथून काढण्यात येणार असून याबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. 27 एप्रिल रोजी जैन इरिगेशन येथील कर्मच-यांसाठी मार्गदर्शन शिबीर, 28 एप्रिल रोजी मोबाईल्स फोनचा वापर / ड्रंकनड्राईव्ह/ ओव्हरस्पीड वाहन चालविणाऱ्याविरुध्द विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तर 29 एप्रिल रोजी ओव्हरलोड, अवैधप्रवासी वाहतूक करणाऱ्याविरुध्द विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. 30 एप्रिल रोजी ब्लॅक फिल्म, रिपलेक्टीव्ह टेप, प्रवासी बसची विशेष तपासणी करण्यात येणार आहे.
तसेच 1 मे रोजी दुचाकी वाहनांची मोफत प्रदुषण तपासणी व तांत्रिक तपासणी करण्यात येणार असून 2 मे रोजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबीराचे आयेाजन करण्यात आले आहे. 3 मे रोजी रस्ता सुरक्षेवर महाविद्यालयीन विद्यार्थ्याना प्रबोधन व माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. तर 4 मे रोजी साखर कारखाने येथे वाहनांना रिप्लेक्टीव्ह टेप लावण्यात येणार असून 5 मे रोजी नो- हाँकींग ड्राईव्हबाबत पथनाट्यपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 6 मे रोजी विना योग्यता प्रमाणपत्र वाहनांची / अंबर दिवे विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून 7 मे रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गुड समारिटन व रस्ता वाहतुकीचे नियम याबाबत जनजागृती, बक्षिस वितरण सोहळा व रस्ता सुरक्षा अभियान 2018 समारोप करण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
०००

No comments:
Post a Comment