Monday, 23 April 2018

मतदार यादीसाठी रंगीत छायाचित्र उपलब्ध करुन देण्याचे आवाहन

         जळगाव, दि. 23 - भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व मतदारांचे रंगीत छायाचित्र प्राप्त करुन मतदार याद्यांचे शुध्दीकरण करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नाहीत अथवा कृष्णधवन छायाचित्र असेल. त्यांनी आपले रंगीत छायाचित्र उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन त्यांना नवीन रंगीत मतदान ओळखपत्र देणे सुलभ होईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जळगाव जिल्ह्यातील मतदार यादीत 80 हजार 38 मतदारांचे छायाचित्र नाही. तसेच 6 लाख 95 हजार 275 मतदारांचे कृष्णधवल छायाचित्र आहेत. या मतदार याद्या मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे उपलब्ध असून ज्या मतदारांचे मतदार यादीत छायाचित्र नाहीत अथवा कृष्णधवल छायाचित्र आहे. अशा सर्व मतदारांनी आपले नजीकच्या काळातील 3.5 से.मी. बाय 3.5 से.मी आकाराचे रंगीत छायाचित्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सहाय्यक मतदार नोंदणी तथा तहसिलदार अथवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेकडेस त्वरीत जमा करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
                                                                          ०००

No comments:

Post a Comment