जळगाव, दि. 2 - महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष मा. रामुजी
पवार (राज्यमंत्री दर्जा) हे दि. 3 ते
5 एप्रिल, 2018 या कालावधीत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा
कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
मंगळवार दि. 3 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 10 वा. दिग्रस
येथुन भुसावळकडे प्रस्थान. सायं 5 वा. विश्रामगृह, भुसावळ येथे आगमन. सायं 6 वा.
सफाई कर्मचा-यांच्या विविध संघटनांच्या पदाधिका-यांसोबत चर्चा व मुक्काम.
दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 11 वा. 30
मि.नी. मुख्याधिकारी, भुसावळ नगरपरिषद, भुसावळ यांच्या समवेत सफाई कर्मचा-यांच्या
समस्यांबाबत बैठक. दुपारी 1 वा. पत्रकार परिषद. दुपारी 1 वा 30 मि.नी. ते 4 वाजेपर्यंत
राखीव. सायं 5 वा. भुसावळ येथुन जळगावकडे प्रयाण. सायं 6 वा. 30 मि.नी. विश्रामगृह,
जळगाव येथे आगमन. सायं 7 वा. सफाई कर्मचा-यांच्या विविध संघटनांच्य पदाधिका-यांसोबत
चर्चा व मुक्काम.
दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 11 वा 30
मि.नी. आयुक्त, जळगाव महानगरपालिका यांच्या समवेत सफाई कर्मचा-यांच्या समस्यांबाबत
बैठक. दुपारी 1 वा. 30 मि.नी. पत्रकार परिषद. दुपारी 2 वा. 30 मि ते 4 वाजेपर्यंत
राखीव. सायं 5 वा. 30 मि.नी. सफाई कर्मचा-यांच्या विविध संघटनांच्या
पदाधिका-यांसोबत चर्चा. रात्री 8 वा. जळगाव येथुन भुसावळ रेल्वे स्टेशनकडे
प्रस्थान. रात्री 10 वा. 40 मि.नी अमरावती- मुंबई एक्सप्रेसने मुंबईकडे प्रस्थान.
०००
No comments:
Post a Comment