जळगाव, दि.7- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह
दि. 8 ते 14 एप्रिल 2018 या कालावधीत साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज जळगाव
येथे सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय
भवन, महाबळ रोड, मायादेवी मंदिरा समोर आयोजित केले आहे. दि. 8 ते 14
एप्रिल या कालावधीत सामाजिक सप्ताह निमित्ताने विविध लोककल्याणकारी
कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सामाजिक सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमास नागरिकांनी मोठया संख्येने
उपस्थित राहावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण श्री. खुशाल गायकवाड यांनी
एका प्रसिध्दी पकाव्दारे केले आहे.
००००
No comments:
Post a Comment