जळगाव, दि. 4 - सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण व वनसंवर्धन यामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना महसुल विभाग तसेच राज्यस्तरावर छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार व्यक्ती, ग्रामपंचायत, शैक्षणिक संस्था, सेवाभावी संस्था यांना गावपातळी, जिल्हा व विभाग या पाच संवर्गात देण्यात येतो.
पुरस्काराचे स्वरुप महसूल विभागस्तरावर प्रत्येक संवर्गामध्ये दोन पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रथम पुरस्कार 50 हजार रुपये व व्दितीय पुरस्कार 30 हजार रुपये. तर राज्यस्तरावर प्रत्येक संवर्गामध्ये तीन पुरस्कार देण्यात येणार असून प्रथम पुरस्कार एक लाख रुपये, व्दितीय पुरस्कार 75 हजार रुपये तर तृतीय पुरस्कार 50 हजार रुपये इतका आहे. यासाठी कमीत कमी 3 वर्ष वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या क्षेत्रात कार्य केलेले असावे.
या पुरस्कारासाठी अर्ज करु इच्छिणा-यांनी त्वरीत आपले जिल्ह्याचे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्याशी संपर्क साधून पुरस्कारासंबधी माहिती प्राप्त करुन घ्यावी. 31 डिसेंबर, 2017 अखेरच्या कार्याच्या आधारे “छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार २०१७” साठीचे प्रस्ताव विहित प्रपत्रात योग्य पूर्ततेसह विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग यांचेकडे सादर करावेत. इच्छूकांनी आपल्या जिल्ह्याचे विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव तथा संबधीत तालुक्यांचे वनक्षेत्रपाल, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र यांचेकडे प्रस्ताव 30 जून, 2018 पर्यत सादर करावेत. असे आवाहन विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००

No comments:
Post a Comment