जळगाव, दि. 9 - देशाचे रक्षण करणारे सैनिक हा
प्रत्येक भारतीयांचा श्रध्देचा विषय आहे. भारतीय सैन्यात जाणाऱ्या अनेक सैनिकांना
देशभक्तीचे बाळकडू हे नॅशनल कॅडेट कोर्स (एनसीसी) मधूनच मिळत असतात. त्यामुळे
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी
शासनमार्फत सर्वोतोपरी मदत देण्याचे आश्वासन महसुल मंत्री तथा जिल्ह्याचे
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
जळगाव येथील 18 महाराष्ट्र बटालियन च्या एनसीसी
इमारतीचे उद्घाटन कोनशिला अनावरण करुन आज पालकमंत्री यांच्या हस्ते संपन्न झाले
यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, कर्नल पांडे,
भरत अमळकर, सिनेट सदस्य दिलीप पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, माणसाच्या
जीवनात शिस्त येण्यासाठी प्रत्येकाने किमान दोन वर्ष तरी सैन्यात सेवा केली
पाहिजे. पूर्वी हे कार्यालय भाडयाच्या जागेत होते. यासाठी शासनाने 1325 स्के. मीटर
जागा उपलब्ध करुन दिली आहे. या जागेवर शासनाने ग्रीन बिल्डींग उभी करुन दिली आहे. या
इमारतीत विविध सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. यावेळी पालकमंत्र्यांनी
इमारतीची पाहणी केली.
याप्रसंगी कर्नल पांडे यांनी प्रास्ताविकात
बटालियनची माहिती दिली. एनसीसीच्या उत्कृष्ट विद्यार्थ्यांचा पालकमंत्र्यांच्या
हस्ते सन्मान करण्यात आला.
शासकीय वसाहतीच्या प्रस्तावित जागेचे
पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपुजन संपन्न
यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचा-यांसाठी गणपती नगर येथे नव्याने बांधण्यात
येणाऱ्या शासकीय वसाहतीच्या प्रस्तावित जागेचे भुमिपुजन करण्यात आले. या वसाहतीसाठी
1 कोटी 30 लाख 40 हजार रुपये खर्च येणार आहे. याप्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे
निंबाळकर यांच्यासह बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment