जळगाव, दि. 5 -
राज्य
निवडणूक आयोगाने जामनेर नगरपरिषदेचा प्रभाग क्रमांक 7 ब वगळून तसेच सावदा येथील प्रभाग
क्रमांक 3 ब बाबत पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केलेला आहे. या निवडणूकीसाठी 6 एप्रिल, 2018 रोजी मतदान होणार
आहे. शुक्रवार, 6 एप्रिल, 2018 हा कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्याने यादिवशी
जामनेर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 7 वगळून उर्वरीत प्रभाग व सावदा येथील प्रभाग
3 ब या क्षेत्रात मतदानाकरीता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी स्थानिक
सुटी जाहिर केली आहे.
तसेच जामनेर नगरपरिषदेच्या प्रभाग
क्रमांक 7 ब मधील अध्यक्ष व सदस्य पदाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 11 एप्रिल, 2018
रोजी मतदान होणार असल्याने यादिवशी प्रभाग 7 ब या क्षेत्रासाठी सार्वजनिक सुटी
जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment