जळगाव, दि. १९ - राज्यातील धर्मादाय रुग्णालयात निर्धन व्यक्ती
ही मोफत उपचार मिळण्यास तसेच दुर्बल घटकातील व्यक्ती ही सवलतीच्या दरात उपचार
मिळण्यास पात्र राहणार आहे. असे सहाय्यक धर्मादाय आयुक्त, जळगाव विभाग, जळगाव
यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
विधी व न्याय विभागाच्या दि. २३ फेब्रुवारी, २०१८
रोजीच्या अधिसूचनेव्दारे, महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे
कलम ४२ अ अ च्या प्रयोजनार्थ निर्धन व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न हे पंच्याऐंशी
हजार रुपयापेक्षा अधिक नसेल व दुर्बल घटकातील व्यक्तीचे एकूण वार्षिक उत्पन्न हे एक
लाख साठ हजार पेक्षा अधिक नसावे. असेही सहायक धर्मादाय आयुक्त यांनी
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
000
No comments:
Post a Comment