जळगाव, दि. ३० - राज्याचे कृषी व
फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत हे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यकम याप्रमाणे -
सोमवार
दि. ३० एप्रिल 2018 रोजी रात्री ९.५० वाजता
सेवाग्राम एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व मोटारीने अजिंठा शासकीय
विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. रात्री १०.०५
वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार दि. १ मे, २०१८ रोजी सकाळी ७.००
वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह जळगाव येथे राखीव. ७.४५ वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून
मोटारीने पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगावकडे प्रयाण. ७.५७ वा. पोलीस
कवायत मैदान, पोलीस मुख्यालय जळगाव येथे आगमन. सकाळी ८.०० वा. महाराष्ट्र राज्य
स्थापनेचा ५८ वा वर्धापन दिन समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. राष्ट्रध्वज वंदन,
सकाळी ८.०५ ते ९.०५ वा. शुभेच्छापर भाषण, बक्षिस व प्रमाणपत्र वितरण समारंभ
कार्यक्रम, पोलीस संचलन, ज्येष्ठ नागरीक व स्वातंत्र्य सैनिक यांना शुभेच्छा.
सकाळी ९.०५ वा. पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, जळगाव येथून मोटारीने अजिंठा
शासकीय विश्रामगृह, जळगावकडे प्रयाण. सकाळी
९ वा. २० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी ११ वा.
२० वा. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथून शासकीय मोटारीने जिल्हाधिकारी, कार्यालय जळगावकडे प्रयाण. दुपारी
११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आगमन. दुपारी ११.३० ते १२.०० वा.
ऑन लाईन डिजीटल स्वाक्षरीयुक्त गा.न.नं.संगणीयुक्त ७/१२ चे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना
वितरण आणि तहसिलदार व उप विभागीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र वितरण समारंभास
उपस्थिती. दुपारी १२.०० ते १.०० वा. मा.मुख्यमंत्री यांचे हस्ते ऑन-लाईन डिजीटल
स्वाक्षरीयुक्त गा.न.नं संगणीकृत ७/१२ चे लोकार्पण सोहळ्यात व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे
उपस्थिती. दुपारी १.०० ते १.३० वाजेपर्यंत राखीव. दुपारी १.३० वा. शासकीय मोटारीने
रेल्वे स्थानककडे प्रयाण. दुपारी १.४५ वा.
जळगाव रेल्वे स्थानक येथून गितांजली एक्सप्रेसने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
मुंबईकडे प्रयाण.
00000
No comments:
Post a Comment