जळगाव, दि. 14 –
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी
कार्यालयात जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी निवासी
उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, चिटणीस
मंदार कुलकर्णी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
तत्पूर्वी आज
सकाळी 9 वाजता जळगाव रेल्वेस्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
पूर्णाकृती पुतळ्यास जळगावचे महापौर ललीत कोल्हे, जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे
आयुक्त किशोरराजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांनी पुष्पहार अर्पण करुन
अभिवादन केले.
यावेळी परिसरातील
नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000





No comments:
Post a Comment