जळगाव, दि. 7 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन आणि
सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.
चंद्रकात पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे-
सोमवार दि. 9 एप्रिल, 2018 रोजी सकाळी 7 वा. 15 मि.नी.
चाळीसगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व
शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सकाळी 7 वा. 30 मि. नी. शासकीय विश्रामगृह
चाळीसगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 8 वा. 45 मि.नी शासकीय विश्रामगृह येथून शासकीय
वाहनाने लक्ष्मीनगर मळयाकडे प्रयाण. सकाळी 9 वा. 15 मि.नी आगमन व शासकीय योजनांची जत्रा,
कृषि महोत्सव व लाभार्थी वाटप कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10 वा. 30 मि.नी.
शासकीय वाहनाने चोपडाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. शासकीय विश्रामगृह चोपडा येथे आगमन
व राखीव. दुपारी 12 वा. 10 मि.नी. शासकीय विश्रामगृह येथून शासकीय वाहनाने कॉटेज
हॉस्पीटल, चोपडाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. 15 मि.नी. कॉटेज हॉस्पीटल, चोपडा येथे
आगमन व दिव्यांग आरोग्य शिबीरास उपस्थिती. दुपारी 1 वा. 15 मि.नी. श्री. घनश्याम
अग्रवाल यांच्या निवासस्थानी राखीव. (स्थळ : यावल रोड, पंकज स्टॉप
जवळ, चोपडा), दुपारी 1 वा 45 मि.नी. शासकीय वाहनाने जळगावकडे प्रयाण. दुपारी 2 वा.
45 मि.नी. आगमन व जिल्हा गौण खनिज बैठकीस उपस्थिती. (स्थळ :- जिल्हाधिकारी
कार्यालय, जळगाव). दुपारी 3.00 वा. खरीप हंगाम आढावा व पाणी टंचाई बैठकीस उपस्थिती
(स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), दुपारी 4 वा. 30 मि.नी. नागरीकांच्या
भेटीसाठी राखीव (स्थळ :- जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव), सायं 5.00 वा. शासकीय
वाहनाने जीएसटी भवन, जळगावकडे प्रयाण. दुपारी 5 वा.05 मि.नी. शासकीय वसाहतीच्या
प्रस्तावित जागेच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायं. 5 वा. 20 मि.नी. शासकीय
वाहनाने मायादेवीनगरकडे प्रयाण. सायं 5 वा. 30 मि.नी. आगमन व मायादेवीनगर, जळगाव
येथील एन.सी.सी. कार्यालयाच्या उदघाटनास उपस्थिती. सायं 5 वा. 45 मि.नी. सा.बा.
विभागाने बांधलेल्या नाटयगृहाची पाहणी (स्थळ :- मायादेवीनगर जळगाव), सायं 6.00 वा.
शासकीय वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, आगमन व राखीव. सायं
सोयीनुसार शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.
००००
No comments:
Post a Comment