Monday, 9 April 2018

अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. विजय कांबळे यांचा जिल्हा दौरा

    जळगाव, दि. 9 - महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. विजय कांबळे,  मा. न्या. श्री. सी. एल. थूल, सदस्य (विधी), मधुकर गायकवाड, सदस्य (सेवा), श्री. नरसिंग शेरखाने, सदस्य सचिव तथा पोलीस अधिक्षक, श्री. रमेश शिंदे, जनसंपर्क अधिकारी हे गुरुवार दि. 12 एप्रिल, 2018 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
         दिनांक 12 एप्रिल, 2018 रोजी मुंबई सी. एच. एम टी येथून रात्री 9 वा 30 मि.नी. कोलकाता मेलने जळगावकडे रवाना. सकाळी 4 वा. जळगाव येथे आगमन व शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. सकाळी 11 वा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अनु. जाती जमाती कर्मचा-यांची भरती, बढती, अनुशेष इ. बाबत विद्यापीठाच्या कार्यालयामध्ये आढावा बैठक. दुपारी 1 ते 2 राखीव. दुपारी 3 ते 5 जिल्हा परिषद जळगाव यांचे अंतर्गत अनु. जाती जमातीच्या कर्मचा-यांच्या भरती, बढती, अनुशेष तसेच अनु. जाती जमातीसाठी राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबतचा आढावा. रात्री जळगाव येथे मुक्काम. शुक्रवार दिनांक 13 एप्रिल, 2018 रोजी कारने नाशिककडे रवाना.
                                                                      ०००

No comments:

Post a Comment