जळगाव
दि. 19- आदिवासी विकास विभागामार्फत राज्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना
भारत सरकार मॅट्रीकेत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परिक्षा फी, योजनांची ई
स्कॉलरशिप देण्यात येत आहे. याकरीता https://etribal.maharashtra.gov या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2014-15 पासून सन
2017-18 करीता ऑनलाईन अर्ज भरणे बाकी असलेल्या विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन अर्ज
भरण्याकरीता 30 एप्रिल 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्राचार्य यांनी ऑनलाईन
अर्ज भरलेल्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे सन 2017-18 तसेच मागील प्रलंबित
शिष्यवृत्तीचे ऑनलाईन बी- स्टेटमेट प्रमाणित करुन 20 एप्रिल, 2018 पर्यंत सादर
करावेत.
शैक्षणिक वर्ष सन 2017-18 पासून भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेसाठी
शिष्यवृत्ती पात्र अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढून बॅकखात्यास
आधारसंलग्न करावे. व ऑनलाईन प्रोफाईल मध्येही अद्यावत करावे. आधार नंबर ऑनलाईन
अद्यावत होत नसेल किंवा उत्पन्नाविषयी सुधारणांसाठी https:// goo.gl/forms/RBAfScNfV४०BmNK६२ या
लिंक वर विचारलेली माहिती सादर करावी. याबाबत प्राचार्य यांनी आपल्या स्तरावरुन
व्यापक स्वरुपात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी तसेच महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवरही
सुचना लावावी. याबाबतची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक/प्राचार्य यांची राहील.
असे प्रकल्प अधिकारी श्री. आर. बी. हिवाळे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
०००
No comments:
Post a Comment