Friday, 6 April 2018

ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांच्या तक्रारीबाबत संबंधित विभागाची बैठक घेणार - अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर


          जळगाव, दि. 6 - जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत सदस्यांनी केलेल्या सुचना व तक्रारींची तत्काळ सोडवणूक होणे आवश्यक आहे. सदस्यांनी केलेल्या तक्रारी ज्या विभागाकडे प्रलंबित असतील, त्या विभागाच्या प्रमुखांची लवकरच बैठक घेऊन या तक्रारी सोडविण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सुचना अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी पुरवठा विभागास दिल्या.
            जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. या बैठकीस शासकीय सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, अन्न व औषध विभागाचे व्ही. टी. जाधव, एम. एन. अय्य, अ. ह. गुजर, दूरसंचार विभागाचे श्री. जे. एस. किनगे, वैद्यमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक श्री. सतिष अभांगे, आरोग्य विभागाचे डॉ. एम. पी. बावने, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे श्री. प्रा. ना. घुले, पोलीस अधिक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी राजेंद्र होळकर, अशासकीय सदस्य श्रीमती रंजना पाटील, श्री. रविंद्र पाटील, श्री. नितीन बरडे, डॉ. अर्चना पाटील, श्रीमती पल्लवी चौधरी, श्री. धनंजय पाटील, ॲड मंजुळा मुंदडा, श्री. विकास महाजन, श्री. रमेश सोनवणे, श्री. विजय माहेरीर, श्री. शिवाजी अहिरराव, सहीत्यीक अ. फ. भालेराव, श्री. बाळकृष्ण वाणी, श्री. सतिष गडे, श्री. आण्णा धुमाळ, श्रीमती उज्वला देशपांडे, डॉ. प्रिती दोषी, श्री. सतिष देशमुख, श्रीमती कल्पना पाटील आदि उपस्थित होते.
            यावेळी बोलतांना श्री. गाडीलकर म्हणाले की, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्राप्त झालेल्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित विभागांनी आपल्या विभागाशी प्राप्त झालेल्या तक्रारींवर कार्यवाही करावी. ज्या विभागाकडे तक्रारी प्रलंबित असतील त्या विभागाच्या प्रमुखांना तशी समज देण्याच्या सूचनाही त्यांनी पुरवठा विभागास दिल्या.
            या बैठकीत अशासकीय सदस्यांनी खाद्य पदार्थ्यांमधील भेसळ, बस स्टॅन्डवरील स्वच्छतागृह महिला व लहान मुलांसाठी मोफत असावे. अनाधिकृतरित्या वाहनांवर प्रेस लिहिणे, प्रमुख रस्त्यांवर शाळा, महाविद्यालय असल्याचे फलक लावणे, वाळु उपश्यास परवानगी दिलेल्या ठिकाणांवरुन वाळूची वाहतुक करणाऱ्या वाहनांना विशिष्ट रंग द्यावा. शहरातील रस्त्यांवर लावण्यात आलेल्या बॅनरमुळे वाहतुकीस होत असलेल्या अडथळयाबाबत तक्रारी व सुचना केल्यात.
०००

No comments:

Post a Comment