जळगाव, दि. 6 - राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता
राज्यमंत्री ना. सदाभाऊ खोत हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार, दिनांक 7 एप्रिल रोजी पहाटे
4.58 वाजता अमृतसर एक्सप्रेसने चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व मोटारीने शासकीय
विश्रामगृह, चाळीसगाव जि.जळगावकडे प्रयाण. पहाटे 5.30 वाजता शासकीय विश्रामगृह
चाळीसगाव, जि. जळगाव येथे आगमन व राखीव. सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह
चाळीसगाव, जि. जळगाव येथे राखीव. सकाळी 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह चाळीसगाव
येथून मोटारीने देवकर मळा, लक्ष्मीनगर, चाळीसगावकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता शासकीय
योजनांची जत्रा व कृषि महोत्सव कार्यक्रमास उपस्थिती, (स्थळ- देवकर मळा, लक्ष्मी
नगर, चाळीसगाव). दुपारी 12.00 वा. देवकर मळा, लक्ष्मीनगर, चाळीसगाव येथून मोटारीने
शासकीय विश्रामगृह चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 12.15 वाजता शासकीय विश्रामगृह
चाळीसगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 12.45 वा. शासकीय विश्रामगृह चाळीसगाव येथून
मोटारीने भडगावरोड, चाळीसगावकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता रयत क्रांती संघटना
शाखा उद्घाटन, (स्थळ- भडगाव रोड, एस. बी. आय. समोर चाळीसगाव). दुपारी 1.30 वाजता
भडगाव रोड, चाळीसगाव येथून मोटारीने पिंप्री बु. प्र.दे., ता. चाळीसगावकडे प्रयाण.
दुपारी 2.00 वा. रयत क्रांती संघटना शाखा उद्घाटन व शेतकरी मेळावा, (स्थळ- बस स्टँडसमोर
पिंप्री बु. प्र.दे. चाळीगसाव). दुपारी 4.30 वा. पिंप्री बु. प्र.दे., ता. चाळीसगाव
येथून मोटारीने टाकळी प्र.दे., ता. चाळीसगावकडे प्रयाण. सायं. 5.00 वाजता सिडलेस लिंबू शेतीस
सदिच्छा भेट, (स्थळ- टाकळी वरखेडारोड). सायंकाळी 5.30 वा. टाकळी ता.चाळीसगाव येथून
मोटारीने शासकीय विश्रामगृह चाळीसगावकडे प्रयाण. सायं. 6.00 वाजता शासकीय
विश्रामगृह चाळीसगाव येथे आगमन व राखीव. रात्री 7.00 वा. शासकीस विश्रामगृह
चाळीसगाव येथून मोटारीने चाळीसगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण. रात्री 7.45 वाजता
महाराष्ट्र एक्सप्रेसने चाळीसगाव रेल्वे स्टेशन येथून पुण्याकडे प्रयाण.
0 0 0
No comments:
Post a Comment