जळगाव,
दि. 7 :- जिल्ह्यातील जामनेर
नगरपरिषद जामनेर सार्वत्रिक निवडणुक -2018 ची मतमोजणी दिनांक 12 एप्रिल रोजी आहे.
या दिवशी गुरुवार असल्याकारणाने
जामनेरचा आठवडे बाजार हा मतमोजणीच्या
दिवशी येत असल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये यासाठी
गुरुवार दिनांक 12 एप्रिल रोजी भरणारा
आठवडे बाजार शुक्रवार दिनांक 13 एप्रिल रोजी भरविण्यात यावा असे आदेश
जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री किशोर राजे निंबाळकर यांनी निर्गमित केले
आहे.
००००
No comments:
Post a Comment