जळगाव, दि. 2 (जिमाका) - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अपर जिल्हाधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या लोकशाही दिनी जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांच्या तक्रारी सर्व विभागांच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तक्रारदारांच्या जागेवर जावून जाणून घेतल्या. आज झालेल्या लोकशाही दिनी एकूण 182 तक्रार अर्ज दाखल झाले. हे तक्रार अर्ज सर्व संबंधित विभागांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती श्री. गाडीलकर यांनी दिली.
या लोकशाही दिनास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, पोलीस उप अधिक्षक सचिन सांगळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, सहायक आयुक्त, समाजकल्याण खुशाल गायकवाड, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, तहसीलदार मंदार कुलकर्णी, अग्रणी बँकेचे श्री. भावसार यांचेसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
०००

No comments:
Post a Comment