जळगाव, दि. 13 - जिल्ह्यात
सुरु असलेल्या जिल्हा व तालुका क्रीडा संकुलाची सद्य:स्थितीबाबत आज सहकार
राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या
दालनात संपन्न झाली.
या बैठकीस माजी मंत्री
तथा आमदार एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे आमदार शिरीषदादा चौधरी, जिल्हाधिकारी
किशोरराजे निंबाळकर, डॉ. जयप्रकाश दुबळे, उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, नाशिक विभाग,
नाशिक, श्रीमती सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, यांच्यासह 15
तालुक्यांचे तहसिलदार तथा कार्याध्यक्ष, तालुका क्रीडा संकुल, उपअंभियता,
सार्वजनिक बांधकाम विभाग, तालुका क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक आदि उपस्थित होते.
या बैठकीत जिल्ह्यात सुरु
असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल व तालुका क्रीडा संकुलांचे बांधकाम तसेच सुरु असलेले
नऊ क्रीडा संकुल व इतर उर्वरीत सहा क्रीडा संकुले यांची सद्य:स्थिती या बाबींचा आढावा
घेण्यात आला.
जिल्ह्यात नऊ तालुक्यात क्रीडा
संकुलाचे बांधकाम सुरु असुन प्राप्त निधीत संकुलांचे बांधकाम पुर्ण झालेले नसल्यामुळे
संकुले पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणीचा प्रस्ताव हा तात्काळ सार्वजनिक
बांधकाम विभागाकडून तयार करुन सादर करण्याचे राज्यमंत्री ना. पाटील यांनी सुचित करण्यात
आले. तसेच निधी उपलब्ध करुन जिल्ह्यातील सर्व तालुका क्रीडा संकुले पूर्ण करण्यात येणार
असुन ही तालुका क्रीडा संकुले कार्यान्वित करुन स्वंयपुर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही
करण्याच्या सुचनाही मंत्रीमहोदयांनी दिल्यात.
तसेच अतिरिक्त निधी उपलब्ध
करुन तालुका क्रीडा संकुल समितीमार्फत सर्व तालुका क्रीडा संकुले पूर्ण करण्यात येवून
तालुक्यातील खेळाडूकरीता खुले करण्यात यावी. असे सर्वानुमते ठरल्याचे जिल्हा
क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment