Wednesday, 11 April 2018

दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी क्रमांक मालिका


      जळगाव दि.11:- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेतर संवर्गातील दुचाकी वाहनांसाठी नवीन नोंदणी एमएच 19/डीई-0001 ते 9999 पर्यंतची मालिका 20 एप्रिल पासून सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी 16 व 17  एप्रिल रोजी दुपारी चार वाजेपर्यंत स्विकारण्यात येतील. तसेच पसंती क्रमांकाच्या अर्जासोबत अर्जदाराने क्रमांकानुसार विहित केलेल्या शुल्काच्या रकमेचा भरणा (D.D) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचे नावे ओळखपत्रासह सादर करावे.
         प्राप्त होणारे अर्ज दुपारी चार वाजेपर्यंत स्विकारले जातील. 17 एप्रिल 2018 रोजी अर्जाची छाणणी करण्यात येईल. एकाच क्रमांकासाठी अनेक अर्ज प्राप्त झाल्यास खालील पद्धतीने क्रमांक जारी करण्यात येतील. 17 एप्रिल 2018 रोजी  दुपारी चार वा. कार्यालयात एकापेक्षा जास्त अर्ज आले किंवा कसे याबाबत संबंधितांशी चौकशी करण्यात येईल.  .
              एकापेक्षा जास्त अर्ज आलेल्या सर्व अर्जदारांनी क्रमांकाचे वाढीव शुल्क धनादेश बंद लिफाफ्यातुन सादर करणे बंधनकारक राहील. त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजेपर्यत बंद लिफाफे उघडण्यात येतील व उर्वरित धनादेश परत करण्यात येतील. नंतर 20 एप्रिल पासून नियमित मालिका सुरु करण्यात येईल. असे जयंत पाटील , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
०००

No comments:

Post a Comment