Thursday, 26 April 2018

महाराष्ट्र दिन मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे हस्ते

         जळगांव, दि. २६ - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ राज्याचे कृषि व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या हस्ते मंगळवार दिनांक १ मे २०१८ रोजी सकाळी ८.00 वाजता येथील पोलीस कवायत मैदानावर होणार आहे.
     या समारंभानिमित्ताने राष्ट्रध्वज वंदन आणि पोलीस दलाच्या विविध पथकांचे संचलन होणार आहे. या समारंभास स्वातंत्र्यसैनिक, राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि जळगाव शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले आहे.
                                                                         000

No comments:

Post a Comment