जळगाव,
दि. १३ - जवाहर नवोदय
विद्यालयात इयत्ता ६ वीच्या
प्रवेशासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका केंद्रावर शनिवार २१ एप्रिल, २०१८ रोजी
परिक्षा होणार आहे. त्याकरिता ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत.
त्यांनी सेतू सुविधा केंद्रातून (सीएससी) आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करावेत व
ज्यांनी ऑफलाईन अर्ज केले आहेत. त्यांचे प्रवेशपत्र त्यांच्या मुख्याध्यापकांकडे
गट शिक्षणाधिकारी यांचेमार्फत पाठविण्यात आले आहेत. असे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य श्री. वे नारायण राव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
ज्या
विद्यार्थी/पालकांना प्रवेशपत्रात त्रुटी किंवा चुकीची माहिती आहे. असे आढळल्यास
त्यांनी त्यांच्या मुख्याध्यापकांमार्फत नवोदय
विद्यालयाच्या प्राचार्यांशी लवकरात लवकर संपर्क साधावा. संपर्ककासाठी मदत क्रमांक
- ०२५८२/२२२१३२/७७९८३४९२७२/९४०४९००९१६ असे असल्याचे प्राचार्य श्री. वे नारायण राव
यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment