जळगाव, दि. 25 - ग्राहक संरक्षण कायद्याची जनजागृती होवून ग्राहकांना आपले अधिकार व जबाबदारीची जाणीव झाली तर त्यांची फसवणूक होणार नाही. याकरीता ग्राहक मार्गदर्शन शिबिराचे महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव व भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अल्पबचत भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कंझुमर मेगा कॅम्प मार्गदर्शन शिबिरात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना श्री. जाधव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे ग्राहक सल्लागार सदस्य ॲङ विक्रांत जिंदाल, वित्तीय सल्लागार नंदकुमार मेनोन आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना श्री. जाधव म्हणाले की, जगातील प्रत्येक व्यक्ती ही ग्राहक आहे. शासकीय कार्यालये ही सुध्दा एक सेवा पुरविणारी संस्था असून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मोबईल हे सर्वात मोठे शस्त्र प्रत्येकाच्या हातात आले आहे. याचा वापर आपण अतिशय सुरक्षितपणे करणे आवश्यक आहे. अन्यथा आपली मोठया प्रमाणात फसवणूक होवू शकते. याबाबत त्यांनी अनेक उदाहरणे दिली. याकरीता नागरीकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक संरक्षण कायद्याची माहिती करुन घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
भारतीय ग्राहक मार्गदर्शक संस्थेचे ग्राहक सल्लागार सदस्य ॲङ विक्रांत जिंदाल यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, आपली सुरक्षितता आपल्याच हातात असल्याने ग्राहकांनी प्रमाणित किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक किंमत देवू नये. वस्तु खराब निघाल्यास वस्तुच्या आवेष्ठनावर देण्यात आलेल्या कस्टमर केअर क्रमाकांशी संपर्क साधावा. परंतु ग्राहक या बाबींकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे त्यांची फसवणूक होते. ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी तसेच त्यांना मोफत मार्गदर्शन व सल्ला देण्यासाठी संस्थेने 1800222262 हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. तसेच mah.helpline@gmail.com या ईमेलवरही ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातात. यावर संपर्क साधून ग्राहक आपल्या तक्रारींचे मोफत निराकरण कसे करावयाचे याचे मार्गदर्शन मिळवू शकतात. यावेळी संस्थेचे वित्तीय सल्लागार नंदकुमार मेनोन यांनी ग्राहकांची होणारी वित्तीय फसवणुक कशी टाळावी. याकरीता काय काळजी घेतली पाहिजे, फसवणूक झाल्यास कोणाशी संपर्क साधावा आदिबाबत मार्गदर्शन केले.
या मार्गदर्शन शिबिरासाठी ग्राहक संरक्षक परिषदेचे शासकीय व अशासकीय सदस्य तसेच नागरीक उपस्थित होते.
000

No comments:
Post a Comment