जळगाव,
दि. 19 - दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होणारा महिला लोकशाही दिन आज
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात
पार पडला.
यावेळी
महिला लोकशाही दिनातील प्रलंबीत अर्ज व निकाली अर्जाचा आढावा घेण्यात आला. संबंधीत
विभागांनी महिला लोकशाही दिनातील तक्रार अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्याच्या
सूचना जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांनी सर्व संबंधितांना दिल्यात. आजच्या
लोकशाही दिनात जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांचेशी संबंधित दोन अर्ज प्राप्त
झाले.
या
प्रसंगी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी
अधिकारी शिवाजी दिवेकर, उपजिल्हाधिकारी (महसुल) अभिजीत भांडे पाटील,
उपजिल्हाधिकारी (रोहयो) जितेंद्र पाटील, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था विशाल
जाधवर, संरक्षण अधिकारी आरती साळूंके, सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास
अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. हे अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित
विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
000
No comments:
Post a Comment