Monday, 23 April 2018

शिधापत्रिकाधारकांनी रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधण्याचे आवाहन


        जळगाव, दि. 23 - जिल्ह्यात संपूर्ण संगणकीकरण प्रकल्पांतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेत संगणकीकरण प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत सर्व रास्तभाव दुकानात ई पॉस मशिन बसविण्यात आल्या असून त्याव्दारे पात्र लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूचे वितरण करण्यात येत आहे. मे २०१८ पासुन जळगाव जिल्ह्यात आधार इनाबल्ड पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम (AePDS) सुरु करण्यात येणार आहे. याकरीता पात्र लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेची अचुक माहिती RCMS मध्ये अद्यावत करणेकरीता संबंधित रास्तभाव दुकानदाराशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
            या प्रणालीत लाभार्थ्यांना पुढीलप्रमाणे धान्य देय होणार आहे. रास्तभाव दुकानातील ई पॉस मशिनव्दारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे Aadhar Authentication  झाले तरी धान्य वितरण करण्यात येईल. Aadhar Authentication नाही झाले तर eKYC (e-Know Your Customer) करुन धान्य वितरण करण्यात येईल. Aadhar Seeding नसलेल्या सदस्यांचे eKYC करुन धान्य वितरण केले जाईल. हे तीनही पर्याय शक्य नसल्यास Route Officer Nominee यांच्या Aadhar Authentication च्या आधारे धान्य वितरण केले जाणार आहे. शिधापत्रिकेवरील माहिती ई पॉस मशीनवर उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणीची पत्र, शासकीय ओळखपत्र/ बँकेचे फोटो पासबुक इ. विभागाच्या वेबसाईटवरील घोषित कागदपत्रे शिधापत्रिकेवरील प्रत्येक सदस्याकडून प्राप्त करुन धान्य वितरण करण्यात येणार आहे. परंतु हा पर्याय एकदाच वापरता येईल. तहसिलदार यांचेकडुन “ No Network FPS” घोषित केले असल्यास त्या दुकानांत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत Manual पध्दतीने धान्य वितरण केले जाईल. परंतु सर्व पात्र लाभार्थ्यांनी आपल्या शिधापत्रिकेची अचुक माहिती RCMS मध्ये अदयावत करणेकामी संबंधित रास्तभाव दुकानदार यांचेशी संपर्क साधावा. प्रत्येक शिधापत्रिकेची NFSA शिधापत्रिकेची RCMS प्रणालीमध्ये डाटा एंट्री होणे आवश्यक असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                               000

No comments:

Post a Comment