Saturday, 21 April 2018

महाराष्ट्र राज्य स्थापना दिन तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे दिले निर्देश - जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर

     जळगाव, दि. 21 - महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापनदिन समारंभानिमित्त सर्व संबधित विभागांवर सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी दिले.
     महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापनदिन समारंभ पूर्वतयारी आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस निवासी उप जिल्हाधिकारी राहूल मुंडके, जिल्हा पुरवठा अधिकारी राहूल जाधव, पोलीस उपअधिक्षक (मुख्यालय) रशीद तडवी, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जयकर, राखीव पोलीस निरिक्षक एकनाथ पाडळे, जिल्हा क्रीडा कार्यालय, होमगार्ड व  सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
     महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिन समारंभानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ 1 मे, 2018 रोजी पोलीस कवायत मैदानावर होणार आहे. या समारंभासाठी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना निमंत्रणे देणे, त्यांची बैठक व्यवस्था करणे, संचलनाची तयारी, प्रमूख पाहुण्यांना मानवंदना देणे, परिसराची स्वच्छता आदि कामांचा आढावा घेऊन सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना दिले.
                                                                             ०००

No comments:

Post a Comment