Monday, 9 April 2018

15 एप्रिलपासून वाहनकर ऑनलाईन पध्दतीने स्वीकारणार

              जळगाव, दि. 9 - उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथील मोटार वाहन विभागाच्या 16 सेवा 1 मार्च, 2018 पासून ऑनलाईन पध्दतीने सुरु करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे परिवहन विभागातील मोटार वाहनांचे परिवहन / परिवहनेत्तर संवर्गातील वाहन कर (व्यवसाय कर वगळता) 15 एप्रिल, 2018 पासून ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
               परिवहन/परिवहनेत्तर संवर्गातील जी वाहने कार्यालयाच्या संगणकीय अभिलेखावर नसतील. अशा वाहनधारकांनी प्रथम त्यांच्या वाहनांची माहिती वाहन 4.0 संगणकीय प्रणालीवर अद्ययावत करणेसाठी वाहनाचे संपूर्ण मुळ कागदपत्रांसह तसेच वाहन मालकाचे आधारकार्ड व भ्रमणध्वनी क्रमांकासह बॅकलॉग एंन्ट्री करणेसाठी संबंधित विभागात सादर करावेत व त्यांनतरच वाहन कर भरण्यासंबंधीची कार्यवाही करावी.
वाहन कर भरणेबाबत परिवहन विभागाच्या संकेतस्थळ www.parivahan.gov.in  व नागरिकांच्या सेवेसाठी महाराष्ट्र शासनाचे www.trashport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जळगाव जिल्ह्यातील नागरिक सुविधा केंद्राची याची (CSC सेंटर) उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांचेशी www.mh१९@mahatranscom.in  वर संपर्क साधावा. असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. पाटील यांनी कळविले आहे.
                                                                  ०००

No comments:

Post a Comment