जळगाव, 12 - शिकाउ उमेदवारी योजनेतंर्गत 106 व्या ऑनलाईन
अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेसाठी 22 ते 30 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत काही
प्रशिक्षणार्थ्यांचे हॉल तिकीट जनरेट झालेले नव्हते. त्यांना जानेवारी-2018 मध्ये
होणाऱ्या दुस-या फेरीमध्ये पुन्हा संधी दिली जाणार आहे. तरी संबधित विद्यार्थ्यांनी
आवेदनपत्र भरण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, (बी.टी.आर.आय) जळगाव यांचेशी
संपर्क साधावा.
ज्या विद्यार्थ्यांच्या
आस्थापना पोर्टलवर ऑनलाईन असतील अशाच विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी दिली जाणार
आहे. तसेच 22 ते 30 ऑक्टोबर, 2017 दरम्यान ऑनलाईन परीक्षेस जे विद्यार्थी
अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यांना सुध्दा या ऑनलाईन परीक्षेची संधी डी.जी.ई.टी, नवी
दिल्ली यांनी उपलब्ध करुन दिली आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2017 आहे. असे
अंशकालीन प्राचार्य बी.टी.आर.आय, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले
आहे.
०००००
No comments:
Post a Comment