Friday, 22 December 2017

पालकमंत्री ना. चंद्रकात पाटील यांचा जिल्हा दौरा



       जळगाव, दि. 22 - राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन वसार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) ना. चंद्रकात पाटील हे शनिवार 23 डिसेंबर, 2017 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
            शनिवार 23 डिसेंबर रोजी पहाटे 4 वा. 18 मि. नी जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन व वाहनाने अजिंठा शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. पहाटे 4 वा. 30 मि. नी. अजिंठा शासकीय विश्रामगृह, जळगाव येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वा. उडान (Regional Connectivity Scheme) अंतर्गत जळगाव - मुंबई विमानसेवेस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ :- जळगाव विमानतळ दुपारी 2 वा. 30 मि.नी. जळगाव विमानतळ येथून विमानाने मुंबई विमानतळाकडे प्रयाण.
०००००

No comments:

Post a Comment