जळगाव, दि. 20 - महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय येणी
100 टक्के वसुल होण्यावर भर द्यावा, असे निर्देश
नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी दिल्या.
जिल्ह्यातील महसूल
अधिकाऱ्यांची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयुक्त महेश
झगडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत श्री. झगडे यांनी
शासनाच्या विविध योजनातंर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांचा आढावा घेतांना त्यांनी
वरीलप्रमाणे निर्देश दिले.
या बैठकीस
जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, दिलीप स्वामी, वनविभागाचे उप वनसंरक्षक आदर्श कुमार
रेड्डी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपायुक्त दिलीप स्वामी, उन्मेश महाजन,
निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके आदी उपस्थित होते.
आयुक्त श्री.
महेश झगडे पुढे म्हणाले की, शासकीय वसुली होत नसल्यास संबंधितांना नोटीसा
द्याव्यात. याबाबत बैठका घेवून शासकीय वसुली पूर्ण करावी. सर्व उपविभागीय अधिकारी,
तहसिलदार यांनी तलाठ्यांच्या दप्तराची तपासणी करावे. त्यात दोष आढळून आल्यास
संबंधितांवर कठोर कारवाई करावी. रि-एडिट
आज्ञावलीच्या कामात प्रत्येक तालुक्याने 31 डिसेंबर पर्यंत राज्याच्या
सरासरीपेक्षा जास्त काम करावे. या कामात तलाठ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी
तहसीलदारांनी मदत करावी. जलयुक्त शिवार अभियानातंर्गत करावयाच्या कामाचे आराखडे
तपासूनच पाठवावेत. त्यात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता सर्व
संबंधितांनी घ्यावी. अकृषक शेतीची प्रकरणे तपासताना व त्यास मंजूरी देताना
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभासंबंधीचीही माहिती देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी
दिल्या.
या बैठकीत
महसूल आयुक्त महेश झगडे यांनी महसूल विभागाच्या विविध कामांचा तालुका निहाय आढावा
घेतला.
या बैठकीस
जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व महसूल विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
000
No comments:
Post a Comment