Thursday, 14 December 2017

जेम GeM पोर्टल संदर्भात 16 डिसेंबर रोजी कार्यशाळेचे आयोजन




       जळगाव, दि. 14 -  शासनाच्या शासकीय विभाग, संस्थांकडुन वस्तु व सेवांच्या खरेदीसाठी केंद्र शासनाने गव्हर्नमेंट ई मार्केटप्लस GeM हे पोर्टल विकसीत केले आहे. शासकीय कार्यालयातील विभागप्रमूखांना या पोर्टल संदर्भात माहिती देणेसाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली शनिवार 16 डिसेंबर, 2017 रोजी दुपारी दोन वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी दिली आहे.
           केंद्र शासनाने राष्ट्रीय खरेदी धोरणांतर्गत खरेदी प्रकीयेत मोठ्या प्रमाणात बदल केले आहे.  सर्व शासकीय विभागांना, कार्यालयांना या पोर्टलवरुनच खरेदी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या कार्यशाळेसाठी  सर्व शासकीय कार्यालयातील विभागप्रमूख, त्यांचे कार्यालयातील संगणक परिचालक, कर्मचारी यांचेसह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
०००००

No comments:

Post a Comment