जळगाव दि.2 - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांचेवतीने 7 डिसेंबर, 2017 रोजी सकाळी 10 वाजता शेतकरी निवास, कृषी उत्पन्न बाजार समिती कॉम्प्लेक्स, जामनेर येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती श्रीमती अनिसा तडवी, सहायक संचालक, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता यांनी दिली आहे.
या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी 6 उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यामार्फत 155 रिक्त पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या रोजगार मेळाव्यात व्यवसायासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज योजनांची माहिती देण्यासाठी शासनाच्या आर्थिक विकास महामंडळांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच कौशल्य विकास अभियांनातर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण मार्गदर्शनासाठी तालुक्यातील व्यवसाय प्रशिक्षण संस्था (व्ही.टी.पी.) उपस्थित राहणार असल्याने या मेळाव्याचा जिल्हयातील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.
तसेच नोकरी इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा व पासपोर्ट साईज फोटो, आधारकार्ड आणि सेवायोजना नोंदणीकार्डसह उपस्थित रहावे. नोकरी ईच्छूक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजना नोंदणी केलेली नसल्यास www.mahaswayan.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. तसेच यापूर्वी महारोजगार वेबपोर्टल वर नोंदणी केलेली असल्यास या सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगींन करावे आणि मोबाईल क्रमांक व आधार क्रमांकाची पडताळणी करुन घ्यावी.
उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित राहणेसाठी ऑनलाईन सहभाग नोंदविणे आवश्यक आहे. त्यामुळे www.mahaswayam.in या संकेतस्थळाला भेट दयावी. ऑनलाईन अर्ज करताना काही अडचण आल्यास 18602330133 या हेल्पलाईनवर संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment