जळगाव, दि. 21 - सामान्य
नागरिकांना विमानप्रवास परवडला पाहिजे. यादृष्टीने एप्रिल 2016 मध्ये केंद्र
शासनाने ‘उडान’ (रिजनल कनेक्टीव्हिटी
स्कीम - आरसीएस) कार्यक्रम जाहीर केला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेला संपूर्ण
देशात सर्व प्रथम महाराष्ट्र शासनाकडून प्रतिसाद देण्यात आला आहे. त्यानुसार 151
कि.मी. अंतरापासून 800 कि.मी. पर्यंतचा विमानप्रवास सलवतीच्या दरात उपलब्ध करुन
देण्यात येत आहे. याअंतर्गत जळगाव येथून मुंबईकरिता 23 डिसेंबर 2017 पासून
विमानसेवा सुरु होणार आहे.
‘उडान’ योजनेसाठी राज्यातील जळगाव, अमरावती, गोंदिया,
नाशिक, नांदेड, सोलापूर,
कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
ही विमानतळे आरसीएस विमानतळे म्हणून अधिसूचित केली आहेत. अधिसूचित केलेल्या
विमानतळांवरुन टप्प्याटप्प्याने आरसीएस विमानसेवा सुरु होणार आहे. पहिल्या
टप्प्यात 128 आरसीएस विमानमार्ग निश्चित
करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर व नांदेड विमानतळांवरुन मुंबईकरिता आणि नाशिक-पुणे हे मार्ग
निश्चित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर हैद्राबाद, कांडला व
पोरबंदर या ठिकाणावरुनही महाराष्ट्रात येणारे आरसीएस विमानमार्ग निश्चित करण्यात
आले आहेत.
प्रधानमंत्री यांनी 27 एप्रिल, 2017
रोजी आरसीएस उड्डाणांचे उद्घाटन केले. त्यात महाराष्ट्राच्या नांदेड-हैद्राबाद या
आरसीएस सेवेचा समावेश होता. ही सेवा ट्रु जेट या विमान कंपनीकडून सुरळीत सुरु आहे.
आता नोव्हेंबर पासून या कंपनीकडून नांदेड-मुंबई ही विमानसेवाही सुरु करण्यात आली
आहे. या विमानसेवांचा दर 1 हजार 420 रुपये ते 3 हजार 500 रुपये या मर्यादेत
विमानप्रवासाच्या अंतरानुसार निश्चित करण्यात आला आहे.
विमान सेवांचे वेळापत्रक
नाशिक, जळगाव, सोलापूर,
कोल्हापूर येथून सुरु होणाऱ्या आरसीएस विमानसेवा डेक्कन चार्टर्ड या
विमान कंपनीने मिळविल्या असून त्यातील 23 डिसेंबर 2017 पासून सुरु होत असलेल्या
विमानसेवांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहेत.
क्र.
|
विमानमार्ग
|
प्रस्थान
|
आगमन
|
वार
|
1
|
नाशिक-मुंबई
|
6.20
|
7.10
|
मंगळवार ते रविवार
|
2
|
मुंबई-नाशिक
|
14.30
|
17.20
|
मंगळवार ते रविवार
|
3
|
मुंबई-जळगाव
|
12.00
|
13.30
|
मंगळवार ते रविवार
|
4
|
जळगाव-मुंबई
|
11.15
|
12.45
|
मंगळवार, बुधवार, रविवार
|
5
|
जळगाव-मुंबई
|
14.30
|
16.00
|
गुरुवार, शुक्रवार, शनिवार
|
6
|
नाशिक-पुणे
|
18.20
|
19.00
|
मंगळवार ते रविवार
|
7
|
पुणे-नाशिक
|
19.20
|
20.00
|
मंगळवार ते रविवार
|
000
No comments:
Post a Comment