जळगाव दि. 8 :- चाळीसगाव
वनपरिक्षेत्रातील मौजे उपखेड जवळील साकुर ता. मालेगाव येथे उपद्रवी बिबट्याने 7 वा
बळी घेतल्याने वरखेडे, उपखेडे तसेच साकुर परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला. सदर
परिसरात दवंडी पिटवून ग्रामस्थांना रात्री-अपरात्री एकटे न फिरण्याचा तसेच रात्री
घराबाहेर न झोपण्याचे आवाहन करण्यात आले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी
ग्रामस्थांशी संवाद साधुन गावागावांत लाऊड स्पिकर असलेली वाहने फिरवण्यात येवुन
तेथे जनजागृती करण्यात येत आहे. बिबट्या बाधीत क्षेत्रात ठिकठिकाणी मानवी मनोरे
(मचान) लावण्यात येवून दुर्बीण, कॅमेरे तसेच बंदूक इ. साधनांसह मचानावर पथकांना
दबा धरुन बसविण्यात आले.
साकुर व उपखेड परिसरात नाशिक वनवृत्त व
धुळे वनवृत्त मधील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या सकाळी 5 वाजेपर्यंत
बिबट्याची शोध मोहिम चालु ठेवली. उपद्रवी बिबट्याचा शोध घेण्यासाठी पुणे तसेच
बोरीवली येथील सुसज्ज पथके मागविण्यात आली आहेत.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी धुळे
येथील एसआरपीएफची एक तुकडी मिळणेकामी वरीष्ठ स्तरावरुन पाठपुरावा करण्यात येत आहे.
बिबट्याचा शोध घेण्यासाठी कॅमेरा
ट्रॅपची संख्या वाढवुन 25 करण्यात आली आहे. तसेच 5 ठिकाणी पिंजरे (ट्रॅप केजेस) व
3 ठिकाणी मानवी मनोरे उभारण्यात आलेले आहेत. अशी माहिती मुख्य वनसंरक्षक
(प्रादेशिक), धुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
00000
No comments:
Post a Comment