Tuesday, 19 December 2017

राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचे जळगाव विमानतळावर आगमन व स्वागत


         जळगाव, दि. 20 - राज्यपाल श्री. सी. विद्यासागर राव यांचे आज सकाळी 8.45 वा. येथील विमानतळावर विमानाने आगमन झाले.

         यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलिस अधीक्षक बच्चन सिंह आदिंनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच पोलीस बॅन्ड पथकाने सलामी दिली.

         यानंतर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. पी. पी. पाटील, महापौर ललीत कोल्हे, अशोक जैन यांनी स्वागत केले.

      त्यानंतर राज्यपाल महोदय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाईन  परीक्षा केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रवाना झाले.
                                                                 ०००००

No comments:

Post a Comment