जळगाव, दि. 18 - सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगाराची संधी
उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने गुरुवार 21 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता खुले
बालगंधर्व नाटयगृह, आर.आर. शाळेजवळ, जळगाव येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात
आले आहे. अशी माहिती श्रीमती अनिसा तडवी, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता विभाग, जळगाव यांनी दिली आहे.
या मेळाव्यात दहा खाजगी आस्थापनांनी
290 रिक्त पदांची मागणी केली आहे. यामध्ये शोध ॲडव्हॅन टेक्नालॉजी प्रा. लि
औरंगाबाद-25 जागा, सेल्स एक्झीक्युटीव्ह, शिक्षण- बी.एस.सी.,एम.एस.सी.,बी.फॉर्म,
एम.फार्म, वय- 20 ते 30 वर्षे. नेक्स स्टेप इंटरप्राईज बडोदा, सेल्स
एक्झीक्युटीव्ह-40 जागा, शिक्षण- एस.एस.सी., आय टी आय, एच.एस.सी. पास, वय -20 ते
28 वर्षे, मानराज मोटर्स, जळगाव, सेल्स एक्झीक्युटीव्ह-20 जागा, शिक्षण- पदवीधर, वय 20 ते 28 वर्षे, स्पेट्रम पॉलीफार्म
प्रा.लि. जळगाव- टयूल ॲण्ड डायमेकर- 20 जागा, शिक्षण- एस.एस.सी., एच.एस.सी.,आय.
टी. आय. नवकिसान बायोटेक लि.जळगाव, सेल्स एक्झीक्युटीव्ह-25 जागा, शिक्षण- एस.एस.सी.
वय- 28 वर्षे, व्हॅरॅक ली. औरंगाबाद, सेल्स एक्झीक्युटीव्ह- 40 जागा, शिक्षण- डिप्लोमा/आय.
टी. आय. वय-25 वर्षे, नवभारत फर्टिलायझयर्स लि. औरंगाबाद, सेल्स एक्झीक्युटीव्ह-30
जागा, शिक्षण- एच.एस.सी.पास, वय 30 वर्षे, व्हीडीओकॉन लि. औरंगाबाद- ट्रेनी - 30
जागा, एस.एस.सी., एच.एस.सी.,आय. टी. आय. वय-25 वर्षे, समर्थ जॉब्स प्रा. लि.
जळगाव- ट्रेनी- 30 जागा, वय- 30 वर्षे, शिक्षण- एस.एस.सी., आय. टी. आय., पदवीधर, वय- 30 वर्षे, आय.टी. एम. स्किल ॲकडमी नागपुर,
ट्रेनी- 30 जागा, शिक्षण- पदवीधर, वय 20 ते 26 वर्षे, याप्रमाणे खाजगी संस्थांनी
आवश्यकतेनुसार पदे अधिसुचित केली आहेत.
याप्रमाणे शैक्षणिक पात्रता पूर्ण
करणाऱ्या गरजू सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी आवश्यक त्या शैक्षणिक पात्रतेची
प्रमाणपत्रे, बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह वेळेत या मेळाव्यास उपस्थित राहवे. असे
आवाहन श्रीमती तडवी, सहाय्यक संचालक, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग,
जळगाव यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment